70 वर्षाच्या महिलेवर 20 माकडांनी केला हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

तेलंगणामध्ये एका वृद्ध महिलेवर माकडांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे माकड हल्ला करत असताना तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही.

चतराबोईना नरसावा (70) असे या महिलेचे नाव असून ती कामारेड्डी जिल्ह्यातील रामरेड्डी गावातील रहिवासी आहे. 3 मार्च रोजी हि महिला घरात भांडी साफ करत होती. त्याच वेळी 20 पेक्षा जास्त माकडांनी तिच्यावर हल्ला केला. घरात त्या एकट्याच असून त्यांची मुलगी लग्न समारंभासाठी बाहेर गेली होती. या हल्ल्यामुळे महिलेच्या छाती, पाठ आणि हात आणि पाय यांना गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. माकडांनी महिलेवर हल्ला केला तेव्हा तिचे शेजारीही तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत, उलट माकडे पळून जाईपर्यंत त्यांनी घराचे दरवाजे बंद केले