सहा वर्षाच्या मुलाच्या घशातून डॉक्टरांनी काढली प्लास्टिकची गोळी

तेलंगणात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षाच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याच्या घशातून डॉक्टरांनी प्लास्टिकची गोळी बाहेर काढली आहे. मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. मुलाच्या पालकांनी डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत.

तेलंगणातील खम्मम येथील सहा वर्षांच्या ष्णमुखाने एक वर्षापूर्वी खेळता खेळता नकळत बंदुकीची प्लास्टिकची गोळी गिळली. यानंतर ष्णमुखाला सतत घशात वेदना होत होत्या. पालकांनी त्याला अनेक वेळा डॉक्टरांकडे नेले, मात्र त्याच्या घसा दुखण्याचे कारण कळले नाही.

अखेर ष्णमुखाच्या पालकांनी खम्मनमधील एका खासगी रुग्णालयात ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. डॉ. प्रवीण कुमार यांनी मुलाची तपासणी केली असता त्याच्या घशात काही वस्तू असल्याचे आढळले. यानंतर एन्डोस्कॉपी करत मुलाच्या घशात अडकलेली प्लास्टिकची गोळी बाहेर काढली.