रंगारेड्डी बनला देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा, अहमदाबाद, बंगळुरूला मागे टाकून मारली बाजी

आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार, मुंबई किंवा बंगळुरू नव्हे, तर तेलंगणातील रंगारेड्डी जिल्हा प्रति व्यक्ती जीडीपीनुसार हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत जिल्हा ठरला आहे. शहरी विस्ताराचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या सर्वेक्षणाप्रमाणे, रंगारेड्डी जिल्ह्याचा प्रति व्यक्ती जीडीपी तब्बल 11.46 लाख रुपये इतका आहे. या यादीत गुरुग्राम, बंगळुरू अर्बन, गौतम बुद्ध नगर (नोएडा), सोलन (हिमाचल प्रदेश), उत्तर आणि दक्षिण गोवा, सिक्कीम, दक्षिण कन्नड (मंगळुरू), मुंबई आणि अहमदाबाद या जिल्ह्यांचाही समावेश आहे.

टॉप 10 श्रीमंत शहर (दरडोई जीडीपीच्या आधार)

 रंगारेड्डी (तेलंगणा) – रुपये 11.46 लाख

 गुरुग्राम (हरयाणा) – रुपये 9.05 लाख

 बंगळुरू शहरी (कर्नाटक) – रुपये 8.93 लाख

 गौतम बुद्ध नगर (उत्तर प्रदेश) – रुपये 8.48 लाख

 सोलन (हिमाचल प्रदेश) – रुपये 8.10 लाख

 उत्तर आणि दक्षिण गोवा – रुपये 7.63 लाख

 सिक्किम – रुपये 7.12 लाख

 दक्षिण कन्नड (कर्नाटक) – रुपये 6.69 लाख

 मुंबई (महाराष्ट्र) – रुपये 6.57 लाख

 अहमदाबाद (गुजरात) – रुपये 6.54 लाख

कसे मिळवले पहिले स्थान?

रंगारेड्डी जिल्ह्याने 11.46 लाखांच्या प्रति व्यक्ती जीडीपीसह अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्याच्या यशामागे आयटी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. प्रसिद्ध टेक पार्क्स, बायोटेक, फार्मास्युटिकल कंपन्यांनी जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे.

बंगळुरू अर्बन, कर्नाटक – जीडीपी प्रति व्यक्ती 8.93 लाख. ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू हे आयटीमध्ये टॉपवर आहे.

गौतम बुद्ध नगर (नोएडा), उत्तर प्रदेश – प्रति व्यक्ती रुपये 8.48 लाख जीडीपी असलेले गौतम बुद्ध नगर हे भविष्यवेधी पायाभूत सुविधा, हिरवीगार निसर्गरम्य ठिकाणे आणि सांस्पृतिक कोपऱयांचे एक सुंदर मिश्रण आहे.

मुंबई मुंबईचा  दरडोई  जीडीपी  रुपये 6.57 लाख रुपये आहे. मुंबईच्या जीडीपीमध्ये घसरण झालीय. यामागे लोकसंख्येचा दबाव, राहणीमानावरील खर्च, आर्थिक विकासाची धिमी गती कारणे आहेत.