तेलंगणात बांधकामप्रवण स्टेडियमची भिंत कोसळली, तीन जणांचा मृत्यू

तेलंगणात सोमवारी एक मोठा अपघात झाला. येथे बांधकाम सुरू असलेल्या एका स्टेडियमची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12हून अधिक मजूर जखमी झाले आहेत.

तेलंगणातील मोइनाबाद येथे हे स्टेडियम बनत होतं. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात मोइनाबाद हे गाव आहे. तिथे सोमवारी हा अपघात झाला आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.