चिंता नको! व्हॉट्सऍपचे चॅटिंग घ्या टेलिग्रामवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपच्या नव्या डेटा पॉलिसीमुळे अनेक जण ते fिडलिट करून वेगळा पर्याय निवडायच्या प्रयत्नात आहेत. त्यातील कित्येक जणांनी तर सिग्नल आणि टेलिग्राम अॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. कमी वेळात या दोन्ही अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही जण अद्याप गोंधळलेले आहेत. आधीच्या व्हॉट्सअॅप चॅटचे काय होणार याची त्यांना चिंता आहे. यावर टेलिग्रामने नवं अपडेट आयओएस जारी केले आहे. नव्या अपडेटमुळे यूजरला व्हॉट्सअॅप आणि इतर अॅपमधून सहज चॅट्स आणि इतर डेटा इम्पोर्ट करता येणार आहे. यासाठी टेलिग्रामचे मायग्रेशन टूल वापरावे लागणार आहे. या टूलची माहिती टेलिग्राम 7.4 अपडेटमध्ये देण्यात आली आहे. या नव्या अपडेटमुळे टेलिग्राम यूजर्सची संख्या वाढण्यात मदत होणार आहे.