
सामना ऑनलाईन । पुणे
राज्यातील विविध शहरांमधील तापमानाने चाळिशी गाठली आहे. उन्हाच्या कडाक्यात दिवसेंदिवस वाढ होत असून शनिवारी राज्यामध्ये अकोला येथे सर्वात जास्त 43.6 अंश सेल्सिअस एवढय़ा तापमानाची नोंद झाली, तर नगरमध्ये 43.1 तापमान नोंदविले गेले. उष्णतेमुळे नागरिकांना चांगलाच उकाडा जाणवत आहे.

























































