2020 पासून तापमानवाढीचा स्फोट, पुढच्या वर्षी उष्णतेची लाट 18 दिवस मुक्काम ठोकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुढच्या वर्षीपासून म्हणजेच 2020 पासून हिंदुस्थानात सर्वत्र तापमान वाढत जाणार आहे. पुढच्या वर्षी देशभरात उष्णतेची लाट उसळणार असून ती तब्बल 18 दिवस मुक्काम ठोकणार आहे. 2064 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा दाह कायम राहणार आहे. ‘नाइन क्लायमेट’ या मॉडोलवरून तापमानवाढीबाबत करण्यात आलेल्या अभ्यासाअंती हवामानतज्ञांनी हा इशारा दिला आहे.

पुण्यात एनडीएच्या परेडमध्ये तीन विद्यार्थ्यांना भोवळ
पुण्यात बुधवारी एनडीए अर्थात नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांना परेडदरम्यान भोवळ आल्याने ते कोसळले. खडकवासला या ठिकाणी एनडीएची परेड घेण्यात आली. या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. 38 ते 41 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानात या विद्यार्थ्यांना परेड सादर करावी लागली. कडक ऊन सहन न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना भोवळ आल्याची घटना गुरुवारी घडली.