नंदुरबार : शॉर्टसर्किटने मंदिराचा दुसरा मजला जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nandurbar-temple-fire

नंदुरबारजवळील प्रकाशा येथे सद्गुरू तोताराम महाराज मंदिराचा दुसरा मजला आगीत जळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली.

नंदुरबारजवळील प्रकाशा येथे दोनशे वर्षे जुने हे मंदिर आहे. तेथील दुसर्‍या मजल्यावर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच हा मजला जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली.