
सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन
शनि ग्रहावर किती तासांचा दिवस असतो, याचे गूढ सोडवण्यात अखेर संशोधकांना यश आले आहे. शनि ग्रहावर 10 तासांचा दिवस असतो, असे नासाच्या कॅसिनो या अंतराळ यानातील माहितीतून स्पष्ट झाले आहे. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे शनि ग्रहावर 29 वर्षे होतात. मात्र, दिवस फक्त 10 तास, 33 मिनिटे आणि 38 सेकंदाचा असतो. खगोलशास्त्राचा विद्यार्थी क्रिस्टोफर मैंकोविज याने यानाने पाठवलेल्या विशिष्ट तरंग पॅटर्नचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. भूकंपात होतात तशा तरंग लहरी, धक्के आणि उलथापालथी शनिवर सतत घडत असतात.



























































