बुलेट ट्रेनच्या 11 पुलांसाठी निविदा उघडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या 11 विशेष पुलांसाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पेरेशन लिमिटेडने आर्थिक निविदा उघडल्या आहेत. यात चार सिमेंट कॉंक्रीटच्या, तर सात पोलादापासून तयार करण्यात येणाऱया पुलांचा समावेश असून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील झारोली गाव तसेच गुजरात राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेली येथे या पुलांची उभारणी करण्यात येणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद या 508 किमीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा नुकताच नवनियुक्त रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे संपादन होऊ न शकल्याने महाराष्ट्रातील या प्रकल्पाचे काम सुरूच झालेले नाही.

या अकरा उड्डाणपुलांच्या बांधणीसाठी तीन तांत्रिकदृष्टय़ा पात्र ठरलेल्या निविदा उघडल्या असून त्यात मेसर्स एम.जी. कॉन्ट्रक्टर्स प्रा.लि. यांनी सर्वात कमी बोली लावली आहे. पॅकेज क्र. एमएएचएसआर -पी-1 (बी) साठी 16 जुलै रोजी ही निविदा उघडण्यात आली आहे.