पुंछमध्ये दहशतवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त; 7 आयईडी जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील पुंछ भागात मंगळवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहशतवाद्यांचा एक कॅम्प उद्ध्वस्त केला. या कॅम्पमधून अनेक विस्फोटक उपकरणे आणि एक वायरलेस सेटही जवानांनी जप्त केल्याचे लष्करी अधिकाऱयांनी सांगितले. याप्रकरणी शोधमोहीम अजूनही सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, रविवारी सुरनकोटच्या जंगलात काही संशयित दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून त्या ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी एका रिकाम्या ठिकाणी 7 आयईडी, एक गॅस सिलिंडर आणि एक वायरलेस सेट आढळून आला. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, जम्मू-राजौरी महामार्गावर दहशतवाद्यांनी स्फोटके पेरून मोठी हानी घडवून आणण्याचा डाव आखला होता. मात्र लष्कराच्या क्वीक ऍक्शन टीमने हा डाव हाणून पाडला.