सगळे ज्यू मरायलाच हवेत! अमेरिकेत ज्यू धर्मीयांवर क्रूर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
usa-terror-attack

सामना ऑनलाईन । पीटर्सबर्ग

अमेरिकेच्या पीटर्सबर्ग शहरातील ज्यू धर्मीयांच्या ट्री ऑफ द हिल प्रार्थनास्थळावर शनिवारी एका इसमाने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 11 जण ठार तर 12 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन अधिकाऱयांचा समावेश आहे. ‘सगळे ज्यू मरायलाच हवेत’ अशी आरोळी ठोकत बंदूकधारीने गोळीबार केला. आरोपीचे नाव रॉबर्ट बॉवर्स आहे.

दर शनिवारी ज्यू लोक सब्बाथच्या प्रार्थनेसाठी प्रार्थनाघरात एकत्र जमतात. तसे या शनिवारीही जमले. या दिवशी एका बाळाचे बारसेही होते. त्यामुळे सिनेगॉग खचून भरले होते. ऐन प्रार्थना सुरू असताना पिस्तूलधारी आत घुसला. त्याने ज्यू लोकांना मारण्याची भाषा करीत उपस्थितांवर गोळीबार सुरू केला. काही क्षणांत पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा आरोपीने स्वतŠला एका खोलीत बंद करून घेतले. थोडय़ाशा झटापटीनंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपीचे नाव रॉबर्ट बॉवर्स (46) असून तो पीटर्सबर्गचा रहिवासी आहे. आरोपी जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

..तर हल्ला टळला असता

पीटर्सबर्गच्या घडामोडीवर लक्ष असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. हा गोळीबार भीषण असून तो मानवतेवर हल्ला आहे. इतकी वर्षे झाली तरी हेच बघावे लागतंय, हे लाजिरवाणं आहे. ज्यूंच्या प्रार्थनास्थळाजवळ सुरक्षा रक्षक असते तर असा हल्ला टळला असता,असे ट्रम्प म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्यामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण इस्रायल आहे. पीटर्सबर्गच्या ज्यू धर्मीयांच्या पाठीशी आहोत, असा शोकसंदेश नेतान्याहू यांनी दिला आहे.

आधी फोटो! मग पार्सल

पार्सल बॉम्बपासून वाचण्यासाठी अमेरिकेच्या टपाल खात्याची शक्कल पत्र, पाकिटे आणि पार्सल यांचा वापर करून बॉम्बस्फोट करण्याच्या घटना लक्षात घेता अमेरिकेच्या टपाल खात्याने शक्कल लढवली आहे. यापुढे प्रत्येक पत्र आणि पार्सलच्या आधी नागरिकांना त्याचा फोटो मिळेल. पार्सल पाठवणाऱ्यांचे नाव आणि पत्ता अशी माहिती संबंधित नागरिकांना ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, बराक ओबामा यांच्यासह डेमोक्रेटिक पार्टीचे नेता यांना पार्सल बॉम्ब पाठवण्यात आलेले हेते. तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘सीएनएन’च्या कार्यालयातही असे पाकीट आले होते. या प्रकरणात सुदैवाने मोठय़ा दुर्घटना घडल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या टपाल खात्याने ही मोफत सर्व्हिस सुरू केली आहे. यासाठी नागरिकांना टपाल खात्याच्या वेबसाइटवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल.