
जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून दहशत माजवली. त्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट पसरली. अशातच जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज पहलगाम येथे एक विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन भ्याड दहशतवादी कृत्यांमुळे येथील पर्यटन थांबणार नसल्याचा कडक संदेश दिला.
अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर काही फोटो शेअर करत सर्व पर्यटकांचे आभार मानले. आम्ही येथे फक्त सरकारी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आलो नसून एक संदेश घेऊन आलो आहोत. दहशतवाद आणि रक्तपात जम्मू-कश्मीरमधील पर्यटन, आनंद आणि विकास रोखू शकणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.