PoK मध्ये 250 हून अधिक दहशतवादी सक्रिय – लष्करप्रमुख नरवणे

486

पाकव्याप्त कश्मीरात दहशतवाद्यांनी आसरा घेतला आहे. तिथे अजूनही 250 हून अधिक दहशतवादी सक्रिय असल्याची शक्यता लष्करप्रमुख मनोज नरवणे व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानचे सर्व मनसुबे उध्वस्त करण्याची क्षमता हिंदुस्थानी सैन्यात आहे असेही नरवणे म्हणाले.

लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले की, पाकव्याप्त कश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद्यांचे 15 ते 20 तळ असू शकतात. त्यात 250 ते 350 दहशतवादी असू शकतात. एवढेच नाही तर दहशतवाद्यांची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते. गेल्या काही दिवसांत कश्मीर खोर्‍यात दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. त्याचे FATF  मुळे या कारवाया कमी झाल्याची शक्यता नरवणे यानी व्यक्त केली.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायाबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळत आहे असे नरवणे म्हणाले. तसेच त्यांच्या सर्व कारवाई आणि मनसूबे हाणून पाडण्याची क्षमता हिंदुस्थानात आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या