
सामना ऑनलाईन । काबूल
येथील अल्पसंख्याक शिया मुस्लिमांच्या शैक्षणिक केंद्रात आज आत्मघाती हल्ला करण्यात आला. यामध्ये 48 विद्यार्थी ठार तर 67 जण जखमी झाले आहेत. शरीराला स्फोटके बांधलेल्या एका व्यक्तीने या केंद्रात प्रवेश करून ती त्याने उडवून दिली. हल्ला झाला त्यावेळी विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी आयोजित वर्गात होते. मृतांत बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तालिबानने या हल्ल्याचा इन्कार केला असून अन्य कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. काबूलपासून जवळच असलेल्या गझनी शहरावर बंडखोर तालिबानींनी कब्जा केलेला आहे. गझनीवरील हल्ल्यानंतर काबूलमध्ये हल्ला झाल्याने सरकार हादरले आहे.


























































