
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरच्या पुलवामामधील त्राल भागात शुक्रवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर ग्रेनेड टाकून हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर सुरक्षादलाने संपूर्ण भागाला घेराव घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
#UPDATE: 1 CRPF personnel has sustained minor injury in grenade attack on security forces in Pulawama’s Tral. His condition is stable; Search operation underway. #JammuAndKashmir https://t.co/BXcwGYPFrz
— ANI (@ANI) October 5, 2018
पुलवामाच्या त्राल भागात 180 बटालियन सीआरपीएफ कॅम्पवर शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. ग्रेनेड टाकून दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याने त्यात एक जवान जखमी झाला. त्याला जवळच्याच इस्पितळात दाखल केले असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सैन्याने शोधमोहीम सुरू केली आहे.



























































