
जम्मू कश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच दहशतवाद विरोधी ऑपरेशनही सुरक्षा दलाने हाती घेतले आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. सुरक्षा दलाच्या या मोहिमेने धास्तावलेल्या दहशतवाद्यांनी आता राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला गती दिली आहे. त्यामुळे दहशतवादी धास्तावले आहेत. आता दहशतवादी कश्मीरबाहेरील नागरिकांना लक्ष्य करत आहेत. दहशतवाद्यांनी रविवारी कश्मीरबाहेरील दोन मजूरावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी या दोन मजूरांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. गेल्या 24 तासातील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी दहशतवाद्यांनी श्रीनगर आणि पुलवामामध्ये राज्याबाहेरील दोन नागरिकांची हत्या केली होती. या घटनेमुळे सुरक्षा दल सतर्क झाले असून परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.




























































