अमावस्येच्या रात्री दहशतवादी घुसताहेत हिंदुस्थानात

760

पाकिस्तानच्या सीमेतून जम्मू-कश्मीरमध्ये घुसण्यासाठी दहशतवाद्यांनी आता नवीन मार्ग शोधून काढला आहे. हिंदुस्थानात घुसण्यासाठी दहशतवादी अमावस्येच्या रात्रीचा आधार घेत असल्याचं एनआयएने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 202 किलोमीटर परिसरात पसरलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेला पार करून हिंदुस्थानात घुसण्यासाठी दहशतवादी रात्री 2 ते पहाटे 5 ही वेळ ठरवत आहेत. कारण, या वेळात संरक्षणासाठी बसवलेले नाईट व्हिजन डिव्हाईस फारसे कामी येत नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमेनजीक पोहोचण्याआधी त्याचं जीपीएस लोकेशन तपासतात. तिथले तपशील जाणून घेण्यासाठी त्यांचं जीपीएस लोकेशन शेअर करून स्थानिक खबऱ्यांच्या संपर्कात राहतात. मगच हिंदुस्थानात घुसण्यासाठी हालचाली सुरू करतात, असं या अहवालात म्हटलं आहे.

राष्ट्रीय महामार्ग 44या संघटनांचे भूमिगत दहशतवादी हिंदुस्थानात घुसणाऱ्या दहशतवाद्यांना मालट्रकांच्या साहाय्याने त्यांच्या ठरलेल्या लोकेशनवर पाठवण्यासाठी मदत करतात. यासाठी ते पहाटेच्या वेळेचा वापर करतात, जेव्हा फारसा उजेड नसतो. साम्बा, दयालचाक आणि बेन नदीचा पूल ही काही संशयित ठिकाणं असल्याचा उल्लेखही या अहवालात केला गेला आहे. गेल्या दोन वर्षांत या ठिकाणांहूनच सर्वाधिक संशयित आणि दहशतवादी पकडण्यात आहे आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या