पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला, खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

1224

पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात एका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मैदानाजवळच असलेल्या टेकडीवरून स्टेडियमच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. सुदैवाने या हल्ल्यात कुणीच जखमी झाले नाही. मात्र या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानात क्रिकेट खेळणे सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे

पाकिस्तानात 2009 साली श्रीलंका टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानातील आतंरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे थांबले होते. मात्र गेल्या वर्षी वेस्ट इंडिज, श्रीलंका व बांगलादेशने पाकिस्तानात खेळण्याची तयार दर्शविली व तब्बल बारा वर्षांनी पाकिस्तानात आतंरराष्ट्रीय सामना खेळला गेला. दरम्यान शुक्रवारी खैबर पख्तुन्वा प्रांतातील कोहात येथे एनएनएन ही क्रिकेट टुर्नामेंट सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव पाकिस्तानात वाढत असतानाही या सान्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते. मात्र सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच या स्टेडीयमवर बाहेरून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे एकच अफरातफर माजली. त्यानंतर पोलिसांनी सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढत स्टेडियम सील केले.

आपली प्रतिक्रिया द्या