
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, 21 नोव्हेंबरला नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. राज्यातील जिल्हास्तरावरील 1 हजार 433 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून एकूण 1 लाख 38 हजार 47 उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
टीईटी आणि राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे उद्या होणार आहेत. टीईटी परीक्षा दोन सत्रांत होणार असून पेपर-1 सकाळी 10.30 ते दुपारी 1 तर पेपर-2 हा दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 या वेळेत होणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र परीक्षा परिषद ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर ठाम आहे. खेडोपाडी, वाडीवस्ती तसेच राज्याच्या कानाकोपऱयातील उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे उमेदवारांना परीक्षा पेंद्र गाठण्यासाठी अडचण येणार आहे.
अशी होणार टीईटी
नोंदणी केलेले उमेदवार
(पेपर-1) 1,16,381,
(पेपर-2) 76,203,
पेपर (1 व 2) 1,38,047























































