टीईटी पेपरफुटी प्रकरणी ३१ ऑक्टोबरला आरोप निश्चित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणाची आजपासून भिवंडीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायमूर्ती संपदा चौधरी यांच्या दालनात नियमित सुनावणी सुरू झाली. या वेळी या गुन्ह्यात अटक केलेल्या सर्व १६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चिती करण्यात येणार आहे.

आजपासून भिवंडी न्यायालयात सुरू झालेल्या नियमित सुनावणीसाठी आरोपींचे वकील कपील दहिया हे दिल्लीहून आले होते. त्यांनी दोषारोपपत्र मराठी भाषेत असल्याने ते समजून घेण्यास अडचण येत असल्याचे सांगत ते इतर भाषेत उपलब्ध करून देण्याची मागणी करत त्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्यावर न्यायाधीश संपदा चौधरी यांनी २८ ऑक्टोबर रोजी पोलीस व सरकारी वकील यांना म्हणणे मांडण्यास सांगितले असून त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चिती केली जाणार आहे, अशी माहिती आरोपींचे वकील अॅड. शैलेश गायकवाड यांनी दिला.