‘ठाकरे’ चित्रपटातील बाळासाहेबांचा आवाज बदलणार!

thackeray-music-launch

सामना ऑनलाईन । मुंबई

‘ठाकरे’ चित्रपटातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज बदलण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा आज या चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी केली. ठाकरे चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्यावेळी ते बोलत होते. सध्या तीन आवाजांच्या चाचण्या सुरू असून रविवार संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाकरे चित्रपटातील ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’ हे गाणे आज लाँच करण्यात आले. वांद्रे येथील ताज लँण्ड एण्ड्समध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते व शिवसेना खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सौ.रश्मीताई ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, चित्रपटात शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी, माँसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता राव, सहनिर्मात्या पूर्वशी राऊत व विधिता राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, वर्षा राऊत, वायकॉम 18 स्टुडियोजचे अजित अंधारे, निखिल साने, कार्निवल मोशन पिक्चर्स अध्यक्ष श्रीकांत भसी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या