
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओचा पुन्हा एकदा मीडियाकर्मचाऱ्यांसोबत गैरव्यवहार केल्यानं चर्चेत आले आहेत. मंगळवारी प्रयुत चान ओचा एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. सध्या थायलंडमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि विद्यमान मंत्र्यांना हटवण्यावरून चर्चा सुरू होत्या. त्यावर पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित करण्यात आले होते. पत्रकारांनी प्रश्न विचाल्यावर ते पोडियमवरून उतरून पत्रकारांजवळ आले आणि त्या सर्वांवर सॅनिटायझर शिंपडू लागले.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओचा दर आठवड्याला एक पत्रकार परिषद घेतात. मंगळवारी, त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले त्याचे त्यांनी आपल्या शैलित उत्तर दिलं. मात्र एका पत्रकाराने मंत्रिमंडळ विस्तारावर विचारले तेव्हा चिडले आणि पत्रकारांवर सॅनिटायझर शिंपडलं. तुम्ही तुमचं काम कर त्यांना त्यांचं करू द्या असं ते म्हणाले.
At the end of today’s weekly post-cabinet meeting presser, PM @prayutofficial was asked yet again about specific names in the next cabinet reshuffle – instead he sprays the entire first row of the press with alcohol spray… pic.twitter.com/w6mDluxQMU
— Saksith Saiyasombut (@SaksithCNA) March 9, 2021





























































