अनोळखी कॉल उचलू नका; बँक खाते रिकामे होईल, थायलंडच्या दूरसंचार प्राधिकरणाचा इशारा

आजकाल सर्व व्यवहार ऑनलाईन केले जात असून डिजिटल युगात ऑनलाईन फ्रॉडचा धोका वाढला आहे. एका कॉलमध्ये स्कॅमर्सकडून बँक खाते साफ होऊ नये म्हणून थायलंडच्या दूरसंचार प्राधिकरणाने इशारा दिला आहे. +697 आणि +698 या दोन क्रमांकावरून आलेले कॉल उचलू नये असे आवाहन थायलंडच्या दूरसंचार प्राधिकरणाने केले आहे. असे कॉल आल्यास हिंदुस्थान सरकारने चक्षु पोर्टल नावाची वेबसाईट तयार केली असून, संशयास्पद कॉल पिंवा मेसेज आल्यास त्यावर तक्रार दाखल करता येईल.