ठाकुर्लीची झाली ‘दिल्ली’

केमिकलचे पाणी आणि उग्र वासाने श्वास गुदमरला

  •  हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
  •  एमआयडीसीतील कारखान्यांचे पाणी थेट नाल्यात
  •  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

 येथे प्रदूषणाने सारेच वेढलेले… घेऊ कसा, कुठे मी स्वच्छंद श्वास आता… अशीच परिस्थिती सध्या ठाकुर्ली व खंबाळपाडय़ाची झाली आहे. जल व वायू प्रदूषणामुळे या परिसराला ‘दिल्ली’चे स्वरूप आले असून हजारो रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. येथून जवळच असलेल्या एमआयडीसीतील कारखान्यांच्या केमिकलचे पाणी थेट नाल्यामध्ये सोडण्यात येत असल्याने उग्र वासाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्याशिवाय अनेकांना खोकला, अंगाला खाज सुटणे तसेच श्वसनाचे विकार जडले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे.

ठाकुर्ली व कल्याणदरम्यान रेल्वे मार्गाच्या बाजूला नव्वद फुटी रस्त्याजवळ मोठमोठी गृहसंकुले गेल्या काही वर्षांपासून उभी राहिली आहेत. लाखो रुपये खर्च करून अनेकांनी येथे फ्लॅट घेतले. एकेकाळी ओसाड असलेला हा भाग आता लोकवस्तीने गजबजून गेला आहे. मंगलमूर्ती, आबोली इस्टेट, संकेश्वर पार्क, कोमास्कर वाडी, अमादीन मोहम्मदिया अशा अनेक मोठय़ा इमारती येथे आहेत. येथून जवळच एमआयडीसी असल्याने धूर तसेच केमिकलचा उग्र वास याचा रात्री उशिरा रहिवाशांना प्रचंड त्रास होतो.

सर्वेक्षण करणार

वायू व जल प्रदूषणाचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांच्या एका शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसराचा सर्व्हे करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी गंगाराम शेलार, राजू नलावडे, मानसी गवाणकर, काळू कोमास्कर आदी उपस्थित होते.

  • गेल्या महिन्याभरापासून एमआयडीसीमधील केमिकलच्या कंपन्या प्रदूषित सांडपाणी नाल्यामध्ये सोडत आहेत. या         पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.
  •  कारखान्यांमधून रात्री 11 च्या पुढे उग्र वासाचा वायू सोडण्यात येतो. त्यामुळे ठाकुर्ली भागातील गृहसंकुलनात             राहणाऱयांना घरांचे दरवाजे व खिडक्या बंद कराव्या लागतात.
  •  डोंबिवली एमआयडीसीमध्ये नियम डावलून अनेक कारखाने वर्षानुवर्षे उत्पादन करीत आहेत. स्थानिक रहिवाशांनी   कारवाईची मागणी करूनही
आपली प्रतिक्रिया द्या