थलपती विजयच्या सभेला परवानगी पण पोलिसांनी ठेवल्या 84 अटी

तामीळ सुपरस्टार थलपती विजयच्या पक्षाच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन 41 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर विजयच्या आगामी सभेसाठी परवानगी देण्यासाठी पोलिसांनी 84 अटी ठेवल्या आहेत. विजयच्या तमिलगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाची तामिळनाडूतील एरोड येथे 18 डिसेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे.

विजय याची 27 ऑक्टोबरला तामीळनाडूतील करूर येथे विराट सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तुफान गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 38 जणांचा मृत्यू झालेला तर 100 हून अधिक जखमी झाले होते. मृतांमध्ये आठ बालकांचा देखील समावेश होता