
ठाणे शहराचा घनकचरा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर मौजे भंडार्ली येथील खासगी मालकांची 3.40 हेक्टर जागा भाडे तत्त्वावर घेण्याकरिता ठाणे आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मौजे भंडार्ली येथील प्रकल्पाला जिल्हास्तरीय घनकचरा व्यवस्थापन समितीची मान्यता मिळाली आहे. तसेच या संदर्भातील अर्ज प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवला असून त्याला मान्यता देण्याचाही निर्णय झाला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न विधान रवींद्र फाटक यांनी विचारला होता.





























































