रुग्णसेवेची क्षमता वाढली, ठाणे सिव्हिल रुग्णालयात पोर्टेबल युनीट; 150 खाटांची व्यवस्था

480

संपूर्ण जिल्ह्यातील गरजू कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सिव्हिल रुग्णालयाची क्षमता वाढवण्यासाठी आणखीन एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. रुग्णालयात 150 खाटांचे पोर्टेबल युनीट तयार करण्यात येत असून आज त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना ताटकळत राहण्याची गरज भासणार नाही.

करोनाबाधितांच्या उपचारात कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 150 बेडसची व्यवस्था करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, प्रिफॅब्रिकेटेड पोर्टेबल क्लिनिकच्या माध्यमातून हा क्षमताविस्तार करण्यात येत असून पहिल्या सहा बेड्स सोमवारपासून सेवेत दाखल करण्यात आल्या. यावेळी स्वतः पालकमंत्री शिंदे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट घालून कोविड रुग्णांची विचारपूस करून अडचणी समजून घेतल्या. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल उंचावले.

सिव्हील रुग्णालयात 214 रुग्ण उपचार घेत असून रुणालयांची क्षमता याआधीच संपली आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची हेळसासंड होत होती. मात्र पोर्टेबल युनीटमुळे रुग्णालयाला एकप्रकारे बुस्टर मिळाले असून गजर पडल्यास आणखीन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या