ठाण्यात कोरोना रोखण्यासाठी वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

733

ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे यासाठी सर्व पालिकांनी ट्रॅक एन्ड ट्रेस वर जास्तीत जास्त भर देऊन एकेका रुग्णांचे जास्तीतजास्त संपर्क शोधणे महत्वाचे आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

ठाण्यासाठी आयोजित बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, उपयुक्त अश्विनी भिडे, उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात अधिक गांभीर्याने रुग्णांचे संपर्क शोधणे तसेच तातडीने त्यांच्यावर निश्चित केलेल्या कार्यपध्दती नुसार पुढील उपचार करणे आवश्यक आहे. बेड्सची उपलब्धता होईल आणो त्याची माहिती गरजू रुग्णास तातडीने मिळेल हे पाहावे, कोव्हिड केअर केंद्रांची तीन स्तरीय रचना खूप प्रभावी आहे. यामध्ये रुग्णांसागे वर्गीकरण त्यांच्या तब्येतीनुसार करून उपचार देण्यात येतात. ही रचना ठाणे जिल्ह्यात व्यवस्थित काम करणे महत्वाचे आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या