दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आजपासून रंगणार चौकार-षटकारांची आतषबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 25 वर्षांनंतर ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेच्या निमित्ताने मर्यादित षटकांचे राष्ट्रीय सीनियर क्रिकेट सामने रंगणार आहेत. बुधकार, 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱया या सामन्यांसाठी अत्याधुनिक बदलांमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज झाले असून स्पर्धेतील पाच सामने या मैदानाकर 8, 9, 11, 12 आणि 14 डिसेंबर रोजी खेळकले जाणार आहेत. विदर्भ विरुद्ध हिमाचल प्रदेश संघांमध्ये या मैदानावर पहिली लढत होणार असून यानिमित्ताने ठाणेकर क्रीडारसिकांना देशभरातील खेळाडूंच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीचा आनंद लुटता येणार आहे.

यंदा विजय हजारे चषक स्पर्धेतील पाच सामने ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. गेले दोन दिवस या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम झाले असून दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यापुढे आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी तसेच दिवसरात्र सामन्याच्या दृष्टीने स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी लागणाऱया सर्व बाबींसाठी नगरविकास विभागाच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आज झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी महापौर नरेश म्हस्के, मुंबई क्रिकेट प्रीमियर लीग गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर, उपमहापौर पल्लकी कदम, सभागृह नेते अशोक कैती, पालिका आयुक्त डॉ. किपीन शर्मा, क्रीडा क सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, नगरसेवक विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरकाडे, नामकंत क्युरेटर नदीम मेमन, उपायुक्त मनीष जोशी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा

ठाणेकरांच्या मागणीनुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियम व गडकरी रंगायतन नाटय़गृह या भव्यदिव्य वास्तू उभ्या करून दिल्या. ही आठवण यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितली. या मैदानावर राष्ट्रीय सीनियर क्रिकेट सामने होत असून ही आनंदाची बाब असून भविष्यात या ठिकाणी आयपीएल तसेच इतर सामनेही खेळविले जातील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. 2018-19 मध्ये बीसीसीआय आणि आयसीसी यांच्या अटी व शर्तीप्रमाणे देशातील नामकंत क्युरेटर नदीम मेमन यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची किकेट व आऊटफिल्ड बनविण्यात आली आहे.

नामांकित संघांची टक्कर

8 डिसेंबर – विदर्भ–हिमाचल प्रदेश
9 डिसेंबर – हिमाचल प्रदेश-जम्मू-कश्मीर
11 डिसेंबर – विदर्भ-ओडिशा
12 डिसेंबर – ओडिशा-जम्मू-कश्मीर
14 डिसेंबर – गुजरात-आंध्र प्रदेश