
सामना प्रतिनिधी । टिटवाळा
वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने रागात एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आंबिवली येथील पाटीलनगरमध्ये ही घटना शुक्रवारी घडली. अंजुम सय्यद (18) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
अंजुमचे वडील रिक्षाचालक असून आई घरकाम करते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अंजुमच्या शिक्षणाचा खर्चदेखील करणे वडील अब्बास यांना कठीण झाले होते. त्यातच अंजुम हिने आपल्या वडिलांकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता, मात्र सध्या आपल्याकडे पैसे नसल्याचे वडिलांनी तिला सांगितले. यामुळे रागात अंजुम हिने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले.































































