माजी आमदार शंकर नम यांचे निधन

समाजाचे नेतृत्व करणारे माजी आमदार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शंकर नम (72) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी असा परिवार आहे.

शंकर नम यांनी आपल्या कार्याची सुरुवात जंगल कामगार सोसायटीमधून केली. तत्कालीन डहाणू विधानसभेचे आमदार भाई कडू यांच्या निधनानंतर त्यांना काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट मिळाले व त्यांनी सुमारे 17 वर्षे डहाणू विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.

काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले. त्यांना राष्ट्रवादीकडून पूर्वीच्या डहाणू लोकसभेचे तिकीट मिळाले व ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र पंतप्रधान अटलबिहारी वाजेपेयींचे सरकार अल्पावधीत पडल्यामुळे त्यांची खासदारकी लवकर संपुष्टात आली. पुढे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत अॅड. चिंतामन वनगा यांनी नम यांचा पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या