ठाणे : पोलीस वेल्फेअर फंडात 10 हजार जमा करा! हायकोर्टाचे दुकानदाराला आदेश

लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देणाऱ्या ठाणे महापालिका अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुंब्रातील दुकानदाराला मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. पोलीस वेल्फेअर फंडात आधी 10 हजार रुपये जमा कर अशी अट घालत नायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

मुंब्य््राातील अमृत नगर, पारिजात अपार्टमेंट येथे 9 एप्रिल रोजी ठाणे महापालिकेचे अधिकारी जितेंद्र साबळे तेथील दुकानदाराना लॉकडाऊनमुळे दुकाने बंद करण्याच्या सूचना करत होते. त्यावेळी दुकानदार अन्वर मीर सय्यद (51) यांनी साबळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून साबळे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अन्वर विरोधात तक्रार दाखल केली. अन्वर विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या