एकनाथ शिंदे पंतप्रधानांच्या रिमोटवर चालतात, त्यांच्यावर मराठ्यांचा काडीमात्र विश्वास नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रिमोटवर चालतात. त्यांच्यावर आमचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. सरकारने मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण दिले नाही आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ठाण्यातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला आता 40 दिवस पूर्ण होत असून अद्याप आरक्षण जाहीर केले नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे असेल तरी काय झाले? आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत, एकत्र रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी काय केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजासाठी काय केले आहे त्यांनी दाखवावे. मुख्यमंत्री हे फक्त पंतप्रधानांच्या रिमोटने चालतात, त्यांच्याकडून जर काही होत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी अशी मागणीही ठाण्यातील मराठा समाजाने केली.

मुख्यमंत्री हे मराठा आहे हीच लाजिरवाणी गोष्ट आहे

मुख्यमंत्री पळवाट काढत आहेत. आरक्षण आता नाही तरी कधीच मिळणार नाहीं हे आम्हाला माहीत आहे. सरकारच्या वतीने मराठा आणि ओबीसी मध्ये फक्त भांडण लावण्याचे काम सुरू आहे. जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर यांना निवडणुकीत धडा शिकवू आता हे आंदोलन सामान्य मराठ्यांनी हाती घेतले आहे. मुख्यमंत्री हे मराठा आहेत हीच लाजिरवाणी गोष्ट असल्याचे जोरदार टीका यावेळी करण्यात आली.