मास्क घाला, अन्यथा कारवाईला सामोरे जा, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

513

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा आदेश ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहे. या आदेशाची अमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणार्‍या ठाणेकरांना आता तोंडाला मास्क लावून निघावे लागणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्याने चालताना, रुग्णालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय वाहन चालवताना, सरकारी बैठकांमध्येही मास्क वापरणे अनिवार्य आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे असल्याचे ठाणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या