
भिवंडीतील फेणेगाव येथे महिलेने तीन अल्पवयीन मुलींसह गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पती रात्रीपाळीस कामावर गेल्यानंतर महिलेने 12, 7 आणि 4 वर्षांच्या मुलीसह गळफास घेत जीवन संपवले.
महिलेचा पती सकाळी 9 वाजता घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. या सामूहिक आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.