एसआरए योजनेंतर्गत आता 300 चौ. फुटाचे घर – गृहनिर्माण मंत्री

881

ठाणे जिल्ह्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 चौ. फुटांएवजी आता 300 चौ.फुटाचे घर देणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली.

आव्हाड म्हणाले, ठाणे येथे 8 एप्रील 2016 पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यालय सुरु झाल्यापासून आतापर्यंत 19 प्रस्ताव नव्याने प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रकल्पांनाही 300 चौ. फु. लागू होणार आहे. ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन योजनांस विकासकांकडून आवश्यक प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या