ठाण्यातील घोडबंदर रोडवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर एसटी बस थेट दुभाजकावर चढली. ठाण्यातून घोडबंदरच्या दिशने जाणआऱ्या मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. याआधी बुधवारी रात्री घोडबंदर रोडवर भलामोठा ट्रक पलटी झाला आणि रात्री 2 ते दुपारी 12 असे वाहतुकीचे बारा वाजल्यामुळे प्रवाशांची 10 तास लटकंती झाली होती.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवर अपघातग्रस्त झालेली एसटी बस ही नंदरबार आगारातील आहे. सकाळच्या सुमारास ही बस मानपाडा पुलावरील दुभाजकावर चढली. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे कार्यालयीन कामांसाठी बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना, शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना आणि गावी गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचा मनस्ताप झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या मदतीने एसटी बस बाजूला करत वाहतूक सुरळीत सुरू केली. सुदैवाने हा अपघात घडला तेव्हा एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. चालक, वाहकही सुखरूप असल्याचे वृत्त आहे.
स्मार्ट ठाण्याचा वाहतूककोंडीने श्वास कोंडला; चाकरमान्यांना लेटमार्क