मुंब्य्राच्या खाडीत तीन मुले बुडाली

बुधवारी रात्री उशिरा मुंब्य्राच्या खाडीमध्ये पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एका मुलाला खाडीतून बाहेर काढण्यात यश आले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. बुडालेल्या मुलांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

आज रात्री नऊच्या सुमारास तिघे जण रेल्वे फास्टट्रकजवळ असलेल्या मुंब्य्राच्या खाडीमध्ये पोहण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ही मुले बाहेर आली नाहीत. त्यामुळे संशय वाढला. सदर घटना समजताच अग्निशमन दलाचे कर्मचारी व आपत्कालीन विभागाने धाव घेतली व मोठय़ा प्रयत्नाने एकाला कसेबसे बाहेर काढले. पण रात्र असल्याने अन्य दोघांचा शोध लागू शकला नाही.

बुडालेली तीनही मुले आजूबाजूच्या परिसरात राहत असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, उद्या पुन्हा सर्च ऑपरेशन केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या