ठाण्यातील ‘कोरोना’च्या दोन रुग्णांना डिस्चार्ज

403

‘कोरोनाची बाधा झालेल्या एका रूग्णाचा 14 दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा आहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला  रूग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आला आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी कासारवडवली येथे राहणाऱ्या या व्यक्तीला  फ्रान्सवरून आल्यानंतर कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने  12 मार्च रोजी कस्तुरबा गांधी हॅास्पीटल येथे चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने  रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. 14 दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या