पृथ्वीच्या दिशेने अधिक वेगाने येतोय लघुग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मोठय़ा वेगाने पृथ्वीच्या कक्षेकडे वाटचाल करत असलेल्या लघुग्रहावर नजर ठेवून आहे. लघुग्रहाचा आकार मोठा असून तो 22 सप्टेंबर रोजी ऍस्टेरॉईड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करू शकतो.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, लघुग्रहाचे नाव ‘2021 एनवाय1’ असे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शास्त्रज्ञ त्याचा मागोवा घेत आहेत. लघुग्रह ताशी 33 हजार 659 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा व्यास 10 ते 300 मीटर आहे. तो पृथ्वीपासून 14 लाख 97 हजार 473 किलोमीटर अंतरावरून सुरक्षितपणे जाईल.

सध्या नासा सुमारे दोन हजार लघुग्रहांचा मागोवा घेत आहे. ‘2021 एनवाय1’ व्यतिरिक्त आणखी एक लघुग्रह पृथ्वीपासून तीन दशलक्ष मैलांपेक्षा जास्त अंतरावरून जाईल, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. याव्यतिरिक्त नासाचा एका अभ्यासात बेन्नू 2300 पृथ्वीवर आदळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.