
मुंबईतील प्रभाग क्र. 173 ची जागा शिंदे गटाकडे गेल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी चक्क `एबी’ फॉर्मची कलर झेरॉक्स काढून अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगानेही हा फॉर्म वैध ठरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे महायुतीमधील राडे थांबतच नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईत महायुती झाल्यानंतर प्रभाग क्र. 173 ची जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे या प्रभागातून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांची पत्नी पूजा कांबळे या निवडणुकीच्या िंरगणात आहेत. असे असताना भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी अर्ज न मिळाल्याने शक्कल लढवत एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून अर्ज सादर केला. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून केळुसकर यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली आहे. केळुसकर यांना आधी भाजपने एबी फॉर्म दिला होता. मात्र नंतर तो काढून घेण्यात आला. मात्र केळुसकर यांनी कलर झेरॉक्स काढून अर्ज सादर केला.





























































