
>> राजेंद्र उंडे
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील एका तरुणाचा राहुरी शहरातील तरुणीशी विवाह ठरला होता. वरपक्षाकडून लाखो रुपयांचा खर्च करून विवाहसोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र हळदीच्या दिवशीच नवरी आणि तिचे नातेवाईक फरार झाल्याने नवरदेवाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवरदेवाने राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
म्हैसगाव येथिल तरुणाचा विवाह राहुरी येथिल तरुणी बरोबर विवाह ठरला आणि वधू कडील मंडळीनी वराकडून पैशांची मागण्यास सुरवात झाली.राहुल त्रिंबक गागरे (वय 30, व्यवसाय शेती, रा. म्हैसगाव) हा तरुण शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून योग्य मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान ताहराबाद येथील ऋषीकेश इरुळे या ओळखीच्या व्यक्तीने राहुरी शहरातील मल्हरवाडी रोड परिसरात राहणारी एक मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला.नवरी-नवरदेव दोघांची भेट ठरवून दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची बैठक झाली आणि दोघांची पसंतीही झाली. त्यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम देण्याची मागणी केली. वरपक्षाकडून विवाह निश्चित करून पुढील तयारी सुरू झाली.नवरीच्या वडीलांनी अडीच लाखांची रक्कम आणि वीस हजार किमंतीचा मोबाईल घेतला.
पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नवरीच्या वडिलांनी वेळोवेळी दीड लाख रुपये रोख, तसेच लग्नाच्या तयारीसाठी आणखी खर्च म्हणून काही रक्कम घेतली. शिवाय नवरदेव राहुल गागरे यांनी नवरीसाठी 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन, तसेच तिच्या कुटुंबीयांसाठी नवीन कपडे व इतर साहित्य खरेदी केले. अशा प्रकारे वरपक्षाकडून एकूण सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा वधूपक्षाने करुन खर्च घेतला.
विवाह सोहळा रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्याचे ठरले होते. नवरदेवाच्या कुटुंबियांनी मंडप, पाहुण्यांची व्यवस्था, जेवणावळीचे नियोजन आणि इतर सर्व तयारी पूर्ण केली होती.राजेश्वर मंदिर परिसरात हळदीची तयारी सुरु असतानाच,राहूरी शहरातून अचानक नवरी गायब झाली. विवाहाच्या आदल्या दिवशी हळद लागण्यापूर्वीच नवरी मुलगी, तिचे वडील आणि नातेवाईक अचानक राहुरी शहरातून बेपत्ता झाले. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला.त्या कुटूबंतील सर्वांचे फोन बंद आढळले. राहुल गागरे यांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली.गुन्हा दाखल करण्या ऐवजी “तपास करतो” अशा स्वरूपाची उडवा-उडवीची उत्तरे दिली.राहुरी पोलिसांनी राहुल गागरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल का करुन घेतला नाही.याबाबत शंका निर्माण होत आहे.
या प्रकारामुळे राहुरी परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विवाहासारख्या पवित्र सोहळ्यात फसवणूक झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करावा.अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
पोलीस ठाण्यात धाव; पण गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ
घडलेल्या प्रकारामुळे हतबल झालेल्या राहुल गागरे यांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे की, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. उलट गुन्हा दाखल न करता “तपास करतो” अशा स्वरूपाची उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे गागरे यांनी सांगितले.
“माझ्या जिवाला धोका”
“नवरी मुलीचे नातेवाईक तसेच काही अन्य लोक माझ्याशी संपर्क साधून मला धमकावत आहेत. मी दोन दिवसांपासून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी चकरा मारत आहे, परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, तरीही पोलिस प्रशासन टाळाटाळ करत आहे.नवरी मुलीच्या नातेवाईकां पासून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी नवरदेव राहुल गागरे (रा. म्हैसगाव) यांनी केली आहे.































































