बंद पडलेल्या लोकलना डिझेल इंजिनाने खेचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेने पावसाने बंद पडलेल्या लोकलना खेचण्यासाठी डिझेल इंजिनाची यशस्वी चाचणी केली आहे. गेल्यावर्षी २९ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाच्या माऱयाने पाण्याची पातळी वाढल्यानंतर ३५ लोकलच्या मोटर खराब झाल्याने मध्य रेल्वेच्या सेवांवर त्याचा अनेक दिवस परिणाम झाला होता. डब्ल्यूडीएक्स – ६ या डिझेलवर चालणाऱया इंजिनाला सहा ट्रक्शन मोटर असून त्यांच्यात पाणी जाऊ नये म्हणून त्यांचे वॉटर प्रूफिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या डिझेल इंजिनांचा वापर आता पावसाच्या पाण्याने बंद पडलेल्या लोकलना पुन्हा दुरुस्तीकरिता कारशेडमध्ये नेण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी दिली.