
रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर आहे. मार्केटमध्ये आकर्षक, सुंदर राख्या घेण्यासाठी गर्दी दिसत आहे. मार्केटमध्ये सध्या लबुबु डॉल राख्यांची क्रेझ दिसून येतेय. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून लबुबु डॉल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. यंदाच्या राखी मार्केटमध्ये या डॉलच्या आकारातील राख्यांना मागणी आहे. युवावर्गामध्ये या डॉलची क्रेझ आहे. दिल्लीच्या एफएनपी ग्लोबलचे सीईओ पवन गादिया म्हणाले, आमच्या स्टोअरमध्ये दिवसाला सुमारे 500 लबुबु राख्यांची मागणी येतेय. विकेंडला त्यामध्ये आणखी वाढ होतेय. आलेला स्टॉक लगेच संपून जातोय. लबुबु राख्यांमध्ये निळा, लाल, जांभळा, गुलाबी असे रंग पसंत केले जात आहेत.