देवदर्शनाची ओढ शिगेला! कैलास मानसरोवर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पवित्र कैलाश पर्वत आणि मानसरोवराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ओढ शिगेला पोहोचली असून यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही मे ते सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. यात्रेसाठी प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येत आहेत. तर देशाच्या कानाकोपऱयातून भाविकांना थेट दर्शनाला घेऊन जाणाऱ्या टूर्स अँड ट्रव्हल्स कंपन्यांनीही भाविकांना साद घालत विविध पॅकेजसह तारखा जाहीर केल्या आहेत.

कैलास मानसरोवर यात्रा बस आणि हेलिकॉप्टर अशा दोन्ही मार्गाने पूर्ण केली जाते. बस आणि हेलिकॉप्टरने कोणत्या दिवशी जायचे याच्या तारखासुद्धा जाहीर झाल्या आहेत. कैलास मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी 9 आणि 12 दिवसांचे विशेष टूर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. भाविकांची सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी आमचे नेहमीच प्राधान्य असते, असे  सम्राट टूर्स अँड ट्रव्हल्स प्रा. लि.चे अशोक सिंह नेपाली आणि अध्यक्ष संदेश पौडेल यांनी सांगितले.