बहुचर्चित ‘संजू’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

37

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर अभिनीत या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरनंतर या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात रणबीर संजूबाबाच्या भूमिकेत दिसणार असून रणबीरसोबतच सोनम कपूर, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, जिम सर्भ अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून संजय दत्त यांच्या जीवनातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. स संजय दत्त यांच्या आईची म्हणजेच नर्गिस यांची भूमिका मनिषा कोइराला साकारणार असून वडिलांची म्हणजेच सुनील दत्त यांची भूमिकेत परेश रावल आहेत. दिया मिर्झा संजूबाबाची पत्नी मान्यता दत्तच्या भूमिकेत तर अनुष्का शर्मा एका पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

दरम्यान, येत्या २९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रणबीरचा हा संजूबाबा चाहत्यांची कितपत पसंती मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या