
जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविणे शक्य होण्यासाठी भविष्यकाळात मधमाशांची भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आधुनिक शेतीला तंत्रशुद्ध मधमाशी पालनाची जोड दिल्यास ग्रामीण भागातील लोकांना पोषणाबरोबरच आर्थिक सुरक्षा व विकासाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.
राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शास्त्र्ााsक्त मधमाशीपालन’ या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. रसाळ बोलत होते. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. रसाळ म्हणाले, मधमाशीपासून उच्चप्रतीचे औषधी गुणधर्म असलेला तसेच जीवनसत्त्वयुक्त मध, वेगवेगळ्या औद्योगिक व सौंदर्य प्रसाधानांमध्ये उपयोगी पडणारे मेण मिळते. निसर्गामध्ये वनस्पतींचे अस्तित्व आणि जैव विविधता टिकविण्यामध्ये मधमाशांचा मोलाचा वाटा आहे. जगाच्या तुलनेत Eिहंदुस्थानात युवकांची संख्या मोठी असल्याने ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी तसेच शेतकऱयांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी आधुनिक पद्धतीचे मधुमक्षिका पालन पूरक ठरणार आहे.
नाशिकच्या गोवर्धन, गंगापूर येथील सुप्रकृती मधुमक्षिका केंद्राचे संस्थापक संचालक डॉ. तुकाराम निकम म्हणाले, मधमाशी हा निसर्ग चक्रातील अन्नधान्य उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा घटक असून, देशभरात जवळजवळ 120 पिके मधमाशीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील ठरावीक पिकांचे परागीकरण तसेच उत्पादन मधमाशीशिवाय शक्य नाही. यासाठी प्रत्येक शेतकऱयाने शेतात 1 ते 2 मधमाशांच्या पेटय़ा ठेवणे तसेच शेताच्या बांधावर फुलाची झाडे लावणे आवश्यक आहे. मधमाशांना आकर्षित करण्यासाठी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
पिंपळगाव बसवंत उद्यानाचे संचालक संजय पवार म्हणाले, महाराष्ट्रात फळपिके व अन्नधान्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात आहे. त्यासाठी 2 ते 3 लाख मधमाशा वसाहतींची गरज असताना प्रत्यक्षात 15 ते 20 हजार वसाहती अस्तित्वात आहेत. यावर उपाय म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱयांनी प्रत्येक गावात गटागटाने मधमाशी पालन सुरू करायला हवे.
राहुरी कृषी विद्यापीठात 27 मार्चपर्यंत चालणाऱया मधमाशीपालन प्रशिक्षण वर्गामध्ये शास्त्र्ााsक्त मधमाशीपालन, मधमाशीच्या विविध प्रजाती, जीवनक्रम, मधमाशीच्या विविध प्रजातींचे संगोपनशास्त्र्ा, हंगामी व्यवस्थापन व दर्जेदार राणीपालन तंत्र, डंख विरहित मधुमक्षिकापालन, मधमाशी वसाहतीचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन व कीडनाशकांचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.






























































