
महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या मान्यतेने 61 व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा महासंग्राम 18 ते 21 डिसेंबरदरम्यान बीडमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर झाली असून गतविजेते पुणे व धाराशीवने पुन्हा एकदा विजेतेपदासाठी जोरदार तयारी केल्याचे बोलले जात आहे.
या स्पर्धेत राज्यातील 24 जिल्हे पुरुष आणि महिलांच्या गटात खेळणार आहेत. एकूण 3-3 संघाचे आठ गट पाडणार असून प्रत्येक गटातील अव्वल संघ बाद फेरी गाठेल.
गटवारी पुढील प्रमाणे आहे
पुरुष गट ः अ गट – पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर. ब गट – मुंबई उपनगर, नंदुरबार, सिंधुदुर्ग. क गट – सांगली, जळगाव, बीड. ड गट – धाराशीव, रत्नागिरी, लातूर. इ गट – मुंबई, परभणी, हिंगोली. फ गट – सोलापूर, नाशिक नांदेड. ग गट – अहिल्यानगर, धूळे, जालना. ह गट – ठाणे, सातारा, पालघर.
महिला गट ः अ गट – धाराशीव, लातूर, परभणी. ब गट – सांगली, रायगड, जळगाव. क गट – पुणे, सातारा, सिंधुदुर्ग. ड गट – नाशिक, जालना, बीड. इ गट – रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर. फ गट – सोलापूर, अहिल्यानगर, हिंगोली. ग गट – ठाणे, धुळे, नांदेड. ह गट – मुंबई, मुंबई उपनगर, पालघर.





























































