
हिंदुस्थानी शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 174 अंकांनी वधारून 83,450 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 42 अंकांनी वाढून 25,725 अंकांवर बंद झाला. आयटीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, एशियन पेंट्स, टायटन, अदानी पोर्ट्स एचसीएल टेक्नोलॉजी, सन फार्मास्युटिकल्स, मारुती सुझुकी इंडिया, इंडिगो, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेक महिंद्राचे शेअर्स वाढले. तर इटरनल, टाटा स्टील, ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये घसरण झाली.





















































